दंगली का होतात आणि कशा त्या थांबतील?
‘दंगल’ हा शब्द वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मी प्रथम ऐकला तो सोलापुरात. मुसलमान समाजाची वस्ती तेथे बर्या च प्रमाणात आहे. १९३० सालाच्या आगेमागे तेथे हिंदू-मुसलमानांचे दंगे वरचेवर होत असत. ‘फोडा आणि निर्वेध राज्य करा हे परकीय ब्रिटिश सत्तेचे धोरण होते. १८५७ सालच्या बंडापासून ब्रिटिश सत्ताधार्यांरनी या दुष्ट राजनीतीचा पाठपुरावा केला होता. त्याला पाने आली होती, आणि …